मॉस्को: जगभरात आता करोना संसर्गाची दुसरी लाट आली असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहेत. या चाचणीतील प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. मात्र, आता सगळ्यांचे लक्ष लशींच्या किंमतीकडे लागले आहे. रशियाने आपल्या ‘स्पुटनिक व्ही’ या लशीची किंमत जाहीर केली आहे. त्याशिवाय ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचेही रशियाने म्हटले आहे.

रशियाच्या थेट गुंतवणूक निधीने (आरडीआयएफ) लशीची किंमत जाहीर केली आहे. ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. तर, इतर देशांमध्ये या लशीचा एक डोस १० डॉलरपेक्षाही (७४० रुपये) कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. लस चाचणीबाबतचा दुसरा अंतरीम निष्कर्षही समोर आला आहे. यामध्ये स्पुटनिक व्ही लस दिल्यानंतरच्या २८ दिवसांमध्ये ९१.४ टक्के प्रभावी ठरली आहे. तर, ४२ दिवसानंतर ही लस ९५ टक्के प्रभावी ठरली आहे. आरडीआयएफचे किरील दिमित्रीव्ह यांनी सांगितले की पुढील वर्षात ५०० दशलक्ष नागरिकांना लस देण्याचे रशिया आणि भागिदार असलेल्या देशांचे उद्दिष्ट आहे. रशियन लशीची किंमत कमी असल्यामुळे जगभरातील अधिकाधिक नागरिकांना लस परवडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:

मॉडर्ना आणि फायजर यांच्या लशीपेक्षा ‘स्पुटनिक व्ही’ची किंमत कमी असणार असल्याचे याआधीच रशियाकडून स्पष्ट करण्यात आले होते. फायजरची किंमत ही प्रति डोस १९.५० डॉलर (१४४६.१७ रुपये) आणि मॉडर्नाची किंमत २५ ते ३७ डॉलर (१८५४ ते २७४४ रुपये) इतकी असणार आहे. त्यामुळे प्रति व्यक्ती ३९ डॉलर आणि ५० ते ७४ डॉलर इतकी लशीची किंमत असणार आहे. फायजर, मॉडर्ना आणि स्पुटनिक व्ही या लशींच्या दोन डोसची आवश्यकता असणार आहे.

वाचा:

वाचा:

रशियाने पहिल्यांदाच करोनाला अटकाव करणारी लस म्हणून स्पुटनिकला मान्यता दिली होती. भारतातही रशियन लशीची मानवी चाचणी सुरू होणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्यावतीने ही चाचणी होणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी या लशीला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली होती. या लशीला मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे.

वाचा: वाचा:
‘स्पुटनिक व्ही’ लस ही सामान्यत: सर्दी निर्माण करणाऱ्या adenovirus या विषाणूवर आधारीत आहे. या लशीची निर्मिती आर्टिफिशल पद्धतीने करण्यात आली आहे. करोनाचा विषाणू SARS-CoV-2 मध्ये आढळणाऱ्या स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल करते. त्यामुळे शरीरात एक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here