मुंबई: आज राज्यात ५ हजार ४३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून आज ३० करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ४,०८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यात राज्यात करोनाचे आकडे वेगानं खाली येत होते. मात्र, दिवाळीनंतर राज्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्यानं आरोग्य प्रशासनापुढं मोठं आव्हान उभे राहिले आहे. आजही करोनामुक्तांपेक्षा करोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. दरम्यान, करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनानंही कंबर कसली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांचा आलेख पुन्हा वाढताना दिसत आहे. आजही राज्यात ५ हजार ४३९ नवीन करोना बाधित रुग्ण सापडले आहे. त्यामुळं राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या १७ लाख ८९ हजार ८०० झाली आहेत.

राज्यात आज करोना मुक्त रुग्णांची संख्या ४ हजार ०८६ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ५८ हजार ८७९ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९२. ६९ टक्के इतका झाला आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे आज, राज्यात ३० रुग्ण करोनामुळं दगावले आहेत त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २ . ६१ टक्के आहे.

राज्यात सध्या ८३ हजार २२१ अॅक्टिव्ह रुग्ण राज्यातील विविध राज्यांत उपचार घेत आहेत. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ०३ लाख ६६ हजार ५७९ चाचण्यांपैकी एकूण १७ लाख ८९ हजार ८०० चाचण्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५ लाख ३६ हजार ६४९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, ६ हजार २२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here