‘देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सेफ झोनमध्ये आहे. सध्या देशात करोनाचा ग्रोथ रेट ०.४ टक्के आहे तर, राज्याचा ग्रोथ रेट ०. २ टक्के इतका आहे. त्यामुळं राज्यची स्थिती समाधानकारक आहे. तरी देखील नागरिकांमध्ये अजूनही जनजागृतीची आवश्यकता आहे,’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
‘कोणत्याही साथीच्या रोगाच्या ३ लाट असतात. तर एका लाटेचे तीन टप्पे असतात. जेव्हा आपण पण दुसरी आणि तिसरी लाटेबाबत बोलतो तेव्हा रुग्णांची संख्या शुन्य असते. त्यानंतर काही दिवसांत पुन्हा रुग्ण संख्या वाढते. पण देशात सध्या कुठेच करोना रुग्णांची संख्या शुन्यावर आलेली नाही. दिल्लीत करोनाच्या पहिल्या लाटेचा तिसरा टप्पा आलेला आहे., असं आपण म्हणू शकतो. पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती येणार नाही. महाराष्ट्रात सध्या पहिली लाट आहे. जर डिसेंबरमध्ये अशी परिस्थीतीच आलीच तर राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच, राज्यात आता पुन्हा चाचण्या वाढवण्यात येणार असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. दिवाळीच्या काळात चाचण्यांची संख्या ६० हजारापर्यंत खाली गेली होती. चाचण्यांची संख्या पुन्हा ८० हजाराच्या आसपास पोहोचली आहे. मात्र, ही संख्या आता ९० हजारापर्यंत नेली जाईल,’ असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनबाबत अद्याप निर्णय नाही
लॉकडाऊनसंदर्भात अद्याप राज्याच्या मंत्रिमंडळात कोणताही निर्णय झालेला नाहीये, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच, करोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times