नवी दिल्लीः बंगालच्या उपसागरात नैऋत्येला निर्माण झालेल्या ‘निवार’ चक्रीवादळचा ( ) वेग वाढवला आहे. बुधवारी संध्याकाळी तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली आहे. यामुळे या चक्रीवादळाने ताशी १०० ते १५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

या वादळाचा सामना करण्यासाठी तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेशात बचाव दलाची १२०० जवान तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच आणखी ८०० जवानांना कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलं आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने १२ गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर वादळच्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या आधीच काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांशी मोदींची केली चर्चा

निवार वादळाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. सखल भाग रिकामे करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. पंतप्रधानांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.

तामिळनाडू-पुदुचेरीच्या बर्‍याच भागात पाऊस

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील चेंबरमबक्कमसह सर्व मोठ्या धरणांवर सतत नजर ठेवली जात आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. हे वादळ मंगळवारी पुदुचेरीपासून ४१० आणि तामिळनाडूपासून ४५० किमी अंतरावर होते. वादळापूर्वी तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या बर्‍याच भागात पाऊस सुरू झाला आहे. वादळामुळे बुधवारीही बर्‍याच ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

तटरक्षक दलाचे ८ जहाज, २ विमाने तैनात

वादळाची तीव्रता पाहता बंगालच्या उपसागराच्या तामिळनाडू आणि पुदुच्चेरी किनाऱ्याजवळ तटरक्षक दलाची ८ जहाजं आणि २ विमानं तैनात करण्यात आली आहेत. या जहाजांद्वारे मालवाहू जहाजं आणि मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना साधवानतेचा इशारा दिला जात आहे. एनडीआरएफचे पथक नागरिकांना खराब हवामानात बचावासाठी कसे उपाय करायचे याची माहिती देत आहेत.

एनडीआरएफचे ३० पथक बचाव सज्ज

नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) डीजी एस. एन. प्रधान यांनी सोमवारी संध्याकाळी निवार वादळाबाबत माहिती दिली. तामिळनाडू, पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशात १२ पथकं तैनात करण्यात आल्या आहेत. या राज्यांमध्ये आणखी १८ पथकांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here