पाटणाः बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी ( ) यांनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद ( ) यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रांचीत तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद सतत एनडीएच्या आमदारांशी मोबाइल फोनद्वारे संपर्क साधत आहेत आणि त्यांना महायुतीत सहभागी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप सुशील मोदी यांनी केला आहे. लालू सध्या रिम्स हॉस्पिटलच्या केली बंगल्यात राहत आहेत.

लालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना महाआघाडीत सहभागी होण्यासह मंत्री होण्याचं आमिष दाखवत आहेत, असा आरोप सुशील मोदींनी केला आहे. जेव्हा त्यांनी संबंधित मोबाइल नंबरवर फोन केला तेव्हा तो फोन लालू प्रसाद यादव यांनी स्वतः उचलला. ‘लालू प्रसाद यादव तुम्ही तुरुंगात बसून एनडीएचा फोडण्याच घृणास्पद कट रचत आहात. यात तुम्हाला यश मिळणार नाही’, असं सुशील मोदींनी लालूंना फोनवर सांगितलं. ट्विट करून सुशील मोदींनी यासंदर्भात माहिती दिली.

सुशील मोदींचा हा आरोप अत्यंत गंभीर आहे. कारण बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड बुधवारी होणार आहे. एनडीएकडून भाजपचे आमदार विजय कुमार सिन्हा आणि महाआडीतील आरजेडीचे आमदार अवध बिहारी सिंह विधानसभा अध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी निश्चित होण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत लालू प्रसाद हे एनडीएच्या आमदारांना फोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप गंभीर आहे. लालू प्रसाद यादव यांची वृत्तीच गुन्हेगारी स्वरुपाची आहे, असा आरोप जेडीयू प्रवक्ते नीरज कुमार यांनी केला.

आरजेडीचा पलटवार

राष्ट्रीय जनता दलाने ( आरजेडी ) सुशील मोदींच्या आरोपांवर पलटवार केला आहे. जनादेश मॅनेज केलेल्या सरकारला नेहमीच धोका असतो. सुशील मोदी हे स्वीकारत आहेत आणि एनडीए सरकार कधीही पडू शकेल अशी भीती त्यांना आहे. खऱ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी सुशील मोदी निराधार आरोप करत आहेत. सुशील मोदींना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. म्हणूनच चर्चेत राहण्यासाठी ते सनसनाटी आरोप करत आहेत, असा पलटवार आरजेडीने केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here