वाचा:
भाजपच्या साम दाम दंड भेद या नितीला भेदण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. भाजपच्या नाकर्तेपणामुळेच राज्याची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली आहे. केंद्राच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली असून येत्या काळात मंदी व कपातीसारख्या संकटाला सर्वच क्षेत्रांना सामोरे जावे लागण्याची भीती आहे, असे सांगत चव्हाण यांनी केंद्रावर निशाणा साधला. विरोधी पक्षांना खिळखिळे करण्यासाठी भाजपकडून केंद्राच्या ताब्यातील यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. मला सुद्धा काही दिवसांपूर्वी आयकर विभागाची नोटीस आली. खासदार , सुप्रिया सुळे यांना सुद्धा ईडीने नोटीसा पाठविल्या होत्या. नोटीसा व केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आकड्यांचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी नेत्यांना, विरोधी पक्षांच्या प्रमुखांना टार्गेट करत भाजप या संस्थांचा गैरवापर करत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. पक्ष आणि व्यक्ती बघून केंद्राकडून अशी कारवाई होते व त्याच धर्तीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाल्याची शक्यताही चव्हाण यांनी वर्तवली. यंत्रणांचा तपास झाला असेल तर त्यातून काय पुढे आले, हे सुद्धा कळले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत केंद्राच्या कारभारावर आक्षेप घेतला.
वाचा:
महाविकास आघाडीचे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यासाठी चव्हाण सातारा येथे आले होते. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, ‘महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेसने संयुक्ततपणे उमेदवार दिले आहेत. या दोन्ही उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याने ते सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार बनले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही आज संयुक्त मेळावे घेतले तसेच अनेक शिक्षण संस्थांना भेटी दिल्या. उद्या मी आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील उर्वरित ठिकाणी संयुक्त दौरे करणार आहोत. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे.’
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times