वाचा:
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रा. डॉ. नितीन धांडे यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रवीण दरेकर यवतमाळमध्ये आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना संजय राऊत व शिवसेनेच्या टीकेला उत्तर दिले. ‘काहीही झाले की भाजप आणि केंद्राला दोष देण्याची शिवसेनेला सवयच झाली आहे. केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आव्हान-प्रतीआव्हानाची भाषा शिवसेनेकडून वापरली जात आहे’, असा आरोप दरेकर यांनी केला. ‘अभिनेत्री यांच्या ऑफिसवर महापालिकेने जेव्हा सूडबुद्धीने कारवाई केली, त्यावेळी हेच संजय राऊत म्हणाले होते, की या कारवाईचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही! मग आता प्रताप सरनाईक यांची ईडीने रूटीन चौकशी केली, तर त्याचा भाजपशी कसा काय संबंध जोडला जाऊ शकतो? आणि काही चूक नसेल तर चौकशीला कशाला घाबरता?’, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
वाचा:
ईडीसारख्या तपास यंत्रणेवर चिखलफेक करणे उचित नाही. माध्यमे आणि विरोधी मत मांडणाऱ्या सर्वसामान्यांना जेलमध्ये टाकताना, कुणी, कुणाला स्वपक्षाच्या शाखेप्रमाणे वागवलं होतं? याचाही विचार तुम्ही करावा, असे सांगताना ते म्हणाले की, कोणत्याही गोष्टीची सुरुवातही जनता करते आणि शेवटही जनताच करते, याचं विस्मरण बहुदा सत्तेच्या गुर्मीमुळे त्यांना झालेलं दिसतं आहे. ‘बाप’ वगैरेची भाषा तुम्हीच करू शकता कारण जनतेनेही तुमच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवलेली नाही, सा टोलाही दरेकर यांनी लगावला.
वाचा:
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचाराच्या घटना होत आहेत. क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत. ठाण्यात जमील नावाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा गोळीबारात हत्या झाली. खुलेआम बाइकवरून येऊन गोळ्या घालण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचा धाक, दरारा उरला नाही, अशी टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times