औरंगाबाद: दुबई येथे झालेल्या आयपीएल ( ) सामन्यावर सट्टा लावण्यासाठी लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या ( ) एन-९ मधील शाखेतील संगणक तज्ज्ञाने इतर सहकाऱ्यांच्या पासवर्डचा वापर करून स्वतःसह आईच्या व मित्राच्या खात्यावर इतर ग्राहकांच्या खात्यावरील रक्कम वळती करीत, बँकेची ४७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात दोन जणांना सोमवारी सायंकाळी (२३ नोव्हेंबर) अटक करण्यात आली आहे. या आरोपींना मंगळवारी (२४ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहारकर यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडीचे आदेश दिले आहे.

भरत म्हसुजी शिंदे, त्याची आई उषा म्हसुजी शिंदे (रा. बँक ऑफ महाराष्ट्र, सोना मंगल कार्यालयाजवळ) व मित्र सचिन गणपत शिंदे (रा. रेणुकामाता मंदिरासमोर जळगाव रोड), अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात अन्य दोन जणांना अटक करण्यात आली असून भरत शिंदे व सचिन शिंदे अशी दोघांची नावे आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here