शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटद्वारे दिली.
‘अत्यंत दुःखद मनाने कळविण्यात येतेय की माझे वडील अहमद पटेल यांचे आज पहाटे ३:३० वाजता निधन झाले आहे. महिनाभरापूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. परंतु त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि बहुतांश अवयव निकामी झाल्याने तब्येत खालावली होती. अल्ला त्यांना जन्नतुल फिरदौस प्रदान करो. मी त्यांच्या शुभचिंतकांना करोनाशी संबंधित कायदा-सुव्यवस्था नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याची विनंती करतो.’
अहमद पटेल यांना १ ऑक्टोबर रोजी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीजवळच्या गुरगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु १५ नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने पटेल यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते.
अहमद पटेल यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times