मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची किंमत स्थिर आहे. याआधी मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १६ पैसे वाढ केली होती तर सोमवारी पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले होते.

आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.२९ रुपये आणि डिझेल ७७.९० रुपये झाला आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.५९ रुपये असून डिझेल ७१.४१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.६४ रुपये असून डिझेल ७६.८८ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.१५ रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.९८ रुपये प्रती लीटर झाले आहे.

ओपेक देशांच्या सदस्यांची येत्या ३० नोव्हेंबरला बैठक होणार आहे. करोना लस, युरोपात पुन्हा लॉकडाउनची शक्यता आणि उत्पादन कपात यावर या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून ४० डॉलरवर स्थिर असलेला कच्च्या तेलाचा भाव आता ४५ डॉलरच्या आसपास गेला आहे. युरोपात पुन्हा लॉकडाउन केल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपातील रिफायनरी तात्पुरत्या बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

आज बुधवारी सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव ४ टक्क्याने वाढला. त्याचबरोबर यूएस वेस्ट टेक्सास क्रूडचा भाव १४ सेंटसने घसरून ४४.७७ डॉलर इतका झाला. क्रूडचा भाव तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यांनी ४८ दिवसांनंतर गेल्या आठवड्यात शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here