सैफरन आर्ट्स पहिल्यांदा ऑनलाइन लिलाव करणार आहे. हा लिलाव येत्या २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर दुसरा लिलाव ३ आणि ४ मार्चला होणार आहे. ईडीने पहिल्यांदा एखाद्या प्रोफेशनल लिलाव हाऊसला जप्त करण्यात आलेली संपत्तीचा लिलाव करण्याची जबाबदारी सोपवली आहे. याआधी गेल्या वर्षी मार्च मध्ये सैफरन आर्ट्सने आयकर विभागासाठी नीरव मोदीच्या पेटिंग्सचा लिलाव करून ५४.८४ कोटी रुपये जमवले होते. दोन्ही लिलावात देशातील कलाकारांच्या जबरदस्त १५ कलाकृतींचा समावेश असणार आहे. यात १९३५ मध्ये अमृता शेरगिल यांनी बनवलेला एक मास्टरपीस आहे. या पेटिंगचा आतापर्यंत कधीच लिलाव करण्यात आला नाही.
याशिवाय प्रसिद्ध एमएफ हुसैन यांच्या महाभारत सीरिजमधील एक ऑयल ऑन कॅन्हॉस चा लिलाव करण्यात येणार आहे. या दोन्ही पेटिंग्सची किंमत १२ कोटी ते १८ कोटी दरम्यान आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या महागड्या गाड्या, घड्या, हँडबॅगचा लिलाव करण्यात येणार आहे. आम्ही ईडीसोबत एका वस्तूची किंमत लावत आहोत. दोन्ही लिलावासाठी एक कॅटलॉग तयार करीत आहोत. यात अमृता शेर-गिल, एमएफ हुसैन आणि व्ही. एस. गायतोंडे यासारख्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे, अशी माहिती सैफरन आर्ट्सचे सीईओ आणि सह संस्थापक दिनेश वजिरानी यांनी दिली. या लिलावात नीरव मोदीच्या पोर्श पनामरा आणि रॉयल गोस्ट कारचा लिलाव करण्यात येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times