मुंबईः यांनी महाविकास आघाडीचे सरकार तीन महिने टिकणार असल्याचा दावा केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनीही त्यांचा हा दावा खोडून काढत दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत, पण त्यांचा हा गुण माहिती नव्हता, असा खोचक टोला लगावला होता. तर, दानवे यांनीही पवारांच्या या टीकेवर उत्तर दिलं आहे.

रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात बोलताना हे सरकार फक्त तीन महिने टिकणार असल्याचा दावा केला होता. याबाबत बोलताना शरद पवारांनी रावसाहेब दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत, हे मला माहिती नव्हतं. दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते राजकारणात आहेत. पण त्यांचा हा गुण माहिती नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ज्योतिषी म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळालं,’ असा मिश्किल टोला शरद पवारांनी लगावला होता. याबाबत बोलताना रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.

‘माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना अधिकार आहे. ते या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र, मला एक गोष्ट समजते, की या राज्यातील जनता नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सरकार कोसळणार असल्याच्या दाव्याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. ‘दोन महिन्यात सरकार येईल. पण सरकार कसं येईल याचं नियोजन तुम्हाला कसं सांगू?’, असं म्हणत सत्ता स्थापनेच्या या घडामोडींबाबत दानवेंनी पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here