मुंबईः मुख्यमंत्री काही राजकीय पक्ष राज्यात आंदोलने करत आहेत. त्यांना समज द्यावी, अशी तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्यानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षाचे नेते यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आम्हाला आनंद आहे की किमान पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरती तरी त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आहे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला आहे.

‘निष्क्रिय सरकारविरुद्ध मोठा रोष जनतेत आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. वीजबिलांचा घोळ त्यामुळं मोठा असंतोष आहे आणि तो या निवडणुकीतून व्यक्त होईल. आमच्या एकाही आंदोलनाची दखल घेतली नाही, एकाही पत्राला उत्तर नाही, कधी कोणती बैठक घेत नाही. या सरकारला प्रश्न सोडवायचे नाही. अशावेळी जनतेचे दुःख मांडले गेले पाहिजेत आणि तेच आम्ही आंदोलनांच्या माध्यमातून मांडतो आहोत,’ असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

‘मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगानं झाली. आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं, असंही ते म्हणाले आहेत. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करुन घेऊ नये, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली आहे.

‘आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. सरकार पाडण्याची वाट पाहत बसलेलो नाही. पण, हेही तितकेच खरे आहे की, अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत. ज्यादिवशी पडेल, त्यादिवशी एक सक्षम सरकार राज्याला देऊ,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

‘मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून केवळ वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे केवळ मराठाच नाही, तर सार्‍याच समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रारंभीपासून सरकारने लक्षच दिले नाही,’ अशी टीका फडणवीस यांनी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here