मुंबई: एखाद्या कामासाठी बाहेर पडल्यावर रस्ता चुकणे ही तशी सामान्य गोष्टी आहे. सध्या तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की अनोळखी शहरात देखील मोबाईलमधील नेव्हिगेशनद्वारे तुम्ही हव्या त्या ठिकाणी पोहोचू शकता. पण अनेक वेळा तंत्रज्ञान अपूरे पडते आणि तेथे व्यक्ती मदतीला येतात. अशीच मदत भारताचा महान फलंदाज () मिळाली. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वाचा-

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जानेवारी २०२०चा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन गाडी चालवत होता आणि एका गर्दीच्या ठिकाणी अडकला होता. व्हिडिओत सचिन म्हणतो, मी कांदीवली इस्टमध्ये आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की मी या ठिकाणी रस्ता विसरला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने मी रस्ता ओळखू शकलो नाही.

वाचा-

त्यानंतर सचिन म्हणाला, माझ्या गाडीपुढे असलेल्या त्या रिक्षा चालकाने मला हायवेपर्यंत रस्ता दाखवण्याची तयारी दाखवली. त्याने माझ्या मागे या मी तुम्हाला रस्ता दाखवते असे म्हटेल. सचिनने संबंधित रिक्षा चालकाचे नाव विचारले. त्याने असे सांगितेल. सचिनने त्याला कुठे राहता विचारले.

वाचा-

रिक्षा चालक मंगेश यांनी सचिनला त्याचा मोठा फॅन असल्याचे सांगितले. माझी मुलगी देखील मोठी फॅन असल्याचे ते म्हणाले. तसेच तुम्ही माझ्या मागे या मी हायवेपर्यंत तुम्हाला सोडतो असे सांगितले. पुढे गेल्यावर सचिनने गाडी थांबवली आणि मंगेश यांच्या सोबत सेल्फी काढला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here