: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासन सुरुवात होणार आहे. पण भारताच्या संभाव्य संघात रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा या दोन यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली आहे. या दोघांपैकी कोणत्या एका यष्टीरक्षकाला संधी द्यायची, याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
गांगुली म्हणाले की, ” सध्याच्या घडीला भारताकडे जगातील अव्वल असे दोन यष्टीरक्षक आहेत. त्यामुळे भारताचा कसोटी संघ निवडताना या दोघांपैकी एकाच यष्टीरक्षकाला संधी मिळू शकते. पंतकडे चांगली गुणवत्ता आहे. त्याचबरोबर तो पुन्हा फॉर्मात येईल, अशी मला आशा आहे. पण या दोघांपैकी एकाचीच निवड भारतीय संघाला करावी लागणार आहे.”
गांगुली पुढे म्हणाले की, ” भारतीय संघाला दोघांपैकी एक यष्टीरक्षक निवडण्याचा निर्णय नक्कीच सोपा नसेल. पण या दोघांपैकी जो खेळाडू चांगल्या फॉर्मात असेल त्याची निवड भारतीय संघ व्यवस्थापनाने करावी, असे मला वाटते.”
पहिल्या एकदिवीय सामन्यापूर्वी भारताच्या संघापुढे दोन महत्वाच्या समस्या असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघाला २७ नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी या समस्यांवर तोडगा भारतीय संघाला काढाला लागणार आहेत. भारतीय संघापुढे पहिली समस्या आहे की, लोकेश राहुलला नेमक्या कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायचे. कारण आयपीएलमध्ये राहुलने सलामीला येत धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे सलामीला आल्यानंतर राहुल चांगल्या फॉर्मात पाहायला मिळू शकतो. त्यामुळे राहुलला सलामीला पाठवायचे की कोणत्या क्रमांकावर खेळवायचे, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. भारताच्या संघापुढे दुसरी समस्या आहे की, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी कोणत्या एका फिरकीपटूला संघात स्थान द्यायचे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times