हैदराबाद: हैदराबादमध्ये ( hyderabad election ) यावेळी काहीतरी ‘अनपेक्षित’ पाहायला मिळू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( ), अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे इतर दिग्गज नेतेही निवडणुकीच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये येण्याची शक्यता आहे. या निवडणुकांवर भाजपने आपलं पूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व साधनांचा वापर करण्याची तयारी केली आहे. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) निवडणूक १ डिसेंबरला ( ) होणार आहे. भाजपने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, इतर केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी आमंत्रित केलं आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही स्टार प्रचारक म्हणून ठेवण्यात आलं आहे. यांच्यासह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( ) यांचीही या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता आहे.

स्थानिक संस्थाच्या या निवडणुकीतूनच हैदराबादच्या महापौराचा निर्णय घेण्यात येईल. गेल्या महापालिका निवडणुकीत शहरातील १५० प्रभागांपैकी केवळ ४ प्रभागांमध्ये भाजपला विजय मिळवण्यात यश आलं होतं. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने (TRS) ९९ वॉर्ड जिंकले, तर असदुद्दीन ओवेसीच्या एमआयएमने ४४ वॉर्ड जिंकले. कॉंग्रेसच्या खात्यात २ होते तर एका प्रभागात टीडीपीचा विजय झाला होता.

गेल्या चार वर्षात भाजपच्या स्थिती किती बदलली आहे? याचं उत्तर म्हणजे राज्यातील डुबकामध्ये अलिकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या झालेल्या विजयासी जोडलं जातंय. हा भाग मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच केसीआरचा ‘गड’ मानला जातो. पण भाजपने इथं १००० मतांनी विजय मिळवला. हा विजय राज्यातील स्थिती बदलण्याचा संकेत म्हणून भाजप पाहात आहे. तेलंगणमध्ये २०१८ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भापला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. तर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत १७ पैकी ४ जागा भाजपने जिंकल्या. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. डुबकाच्या विजयाने ही शक्यता अधिक वाढली आहे. भाजपचा आत्मविश्वास वाढण्याचं कारण म्हणजे डुबका निवडणुकीतील विजय. डुबकातील पोटनिवडणुकीत राज्याचे अर्थमंत्री हरीश राव यांनी टीआरएसचा कार्यभार स्वीकारला होता. राव यांची प्रतिमा उत्तम निवडणूक रणनीतिकार म्हणून आहे. पण असं असूनही त्यांच्या पक्षाला डुबकामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तेलंगणमध्ये संधी असल्याचं भाजपला वाटतं. मोठा विरोधी पक्ष म्हणून उभरण्याची भाजपला मोठी शक्यता दिसतेय. राज्यात कॉंग्रेस पक्ष खूपच कमकुवत झाला आहे. यामुळे टीआरएसला आव्हान देणारी महापालिका निवडणूक ही पहिली पायरी असेल, असं भाजप नेत्यांना वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनिती तयार करणारे भुपेंद्र यादव यांच्याकडे हैदराबाद महापालिका निवडणुकांची महत्त्वाची जबाबदारी पक्षाने देण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमधील एनडीएचा विजय आणि भाजपची उत्तम कामगिरी निश्चित करण्यासाठी भुपेंद्र यादव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी भाजपने इतर अनेक राज्यांच्या नेत्यांवरही जबाबदारी सोपवली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here