मुंबई : आपल्या फुटबॉल कौशल्याने संपूर्ण जगावर मोहिनी घालणारे अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू यांचे आज निधन झाले, ते ६० वर्षांचे होते. मॅरेडोना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण आज पुन्हा एकदा मॅरेडोना यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

मॅरेडोना यांना यापूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ११ नोव्हेंबरला मॅरेडोना यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर मॅरेडोना यांना ८ दिवसांनी पुन्हा रुग्णालयात भरती केले होते. तेव्हा त्यांच्यावर तातडीने मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

मॅरेडोना यांची गणना सर्वकालिन महान फुटबॉलपटूंमध्ये केली जायची. अर्जेंटीनाला १९८६ साली फुटबॉल विश्वचषक जिंकवून देण्यात मॅरेडोना यांचा मोलाचा वाटा होता. मॅरेडोना हे जसे मैदानाबाहेरही आपल्या काही गोष्टींमुळे प्रकाशझोतात आले होते. फुटबॉल खेळत असताना त्यांना चाहत्यांनी देवत्व बहाल केले होते. पण ‘आपण फुटबॉलचे देव नसून एक सामान्य फुटबॉलपटू आहोत’, असे वक्तव्य अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांनी कोलकातामध्ये आल्यावर एका कार्यक्रमात केले.

मॅरेडोना भारतामध्ये पहिल्यांदा २००८ साली आले होते. त्यानंतर त्यांचा भारताचा दुसरा दौरा ९ वर्षांनी म्हणजेच २०१७ साली झाला होता. यावेळी मॅरेडोना यांची एक झलक पाहण्यासाठी भारतामधून बरेच चाहते कोलकाता येथे दाखल झाले होते. मॅरेडोना यांच्या नावाने कोलकातामध्ये एक पार्क उभारण्यात आले होते. या पार्कचे उद्घाटन मॅरेडोना यांच्याच हस्ते करण्यात आले होते. या पार्कात उभारण्यात आलेल्या त्यांच्या १२ फुटी पुतळ्याचे अनावरणही मॅरेडोना यांच्या हस्ते करण्यात आले. या पुतळ्याच्या हातात १९८६ चा विश्वचषक दाखवण्यात आला होता. आपल्याच नावे असलेल्या पार्कात आपला पुतळा उभाल्याबद्दल मॅरेडोनाने समाधान व्यक्त केले होते. त्याचबरोबर एका कार्यक्रमात मॅरेडोना यांनी ११ कर्करोग पीडितांना १०-१० हजार रुपयांचे धनादेश दिले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here