नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावातून ( ) भारत आणि अमेरिका यांच्यातील ( ) जवळीक वाढली आहे. भारतीय नौदलाने हिंदी महासागर क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी एका अमेरिकन कंपनीकडून दोन ( ) भाडेतत्त्वार घेतली आहेत. आता ही ड्रोन पूर्व लडाखमध्ये ( ) चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर ( Lac) तैनात केले जाण्याची शक्यता आहे. भारत-चीनमधील सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या आपत्कालीन खरेदी अधिकारांतर्गत नौदलाकडून अमेरिकेच्या या ड्रोनचा समावेश केला गेला आहे.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात हे ड्रोन भारतात आले आणि आयएनएस रजाली येथील भारतीय नौदल तळावर २१ नोव्हेंबरला उड्डाण संचालनात त्यांचा समावेश झाला, अशी माहिती उच्च सरकारी सूत्रांनी दिल्याचं एएनआयच्या वृत्तात म्हटलं आहे. ड्रोनची उड्डाण आधीच सुरू झाली आहेत आणि ३० तासांहून अधिक काळ हवेत राहण्याच्या क्षमतेमुळे नौदलासाठी महत्त्वाची गोष्ट ठरली आहे. एक अमेरिकन क्रू नौदलाला मशीन्स ऑपरेट करण्यास मदत करतील, असं सूत्रांनी सांगितलं.

भारताने ही ड्रोन एका वर्षासाठी भाडेतत्वार घेतली आहेत. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी आणखी अशी १८ ड्रोन अमेरिकेतून घेण्याची तयारी केली आहे. पूर्व लडाखमधील चिनी आक्रमकतेविरोधात अतिशय निकटतेने काम करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संरक्षण अधिग्रहण प्रक्रिया आणि संरक्षण खरेदी नियमांनुसार शस्त्रास्त्र यंत्रणाला भाडेतत्त्वावर घेण्याचा पर्याय देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. यामुळे पैसे वाचतात आणि देखभालीची जबाबदारी देखील विक्रेत्यावर अवलंबून असते. अमेरिकेचा सपोर्ट स्टाफ फक्त देखभाल आणि तांत्रिक अडचणींच्या मुद्द्यावर मदत करतील. तर सर्व नियोजन आणि नियंत्रण भारतीय नौदलाच्या जवानांकडे असेल, असं सूत्रांनी सांगितलं.

उड्डाण दरम्यान ड्रोनने गोळा केलेला डेटा भारतीय नौदलाची मालमत्ता असेल, असं सूत्रांनी सांगितलं. भारतीय नौदलाकडे आधीपासूनच ९ पी -8 आय लाँग रेंजची पाळत ठेवणारी विमानं असून पुढील काही वर्षांत अशी आणखी ९ विमानं मिळतील. भारत हेलिकॉप्टरमध्ये २४ एमएच -६० रोमियो खरेदी करणार आहे. यासाठी भारत आणि अमेरिकेने संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्यासाठीही करार केले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here