चेन्नईः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘निवार’ चक्रीवादळाची ( ) लँडफॉल प्रक्रिया ( nivar expected landfall ) सुरू झाली आहे. चक्रीवादळ हे सध्या पुदुच्चेरीपासून ४० किलोमीटर आणि कुड्डलोरच्या दक्षिण-पूर्वेस ५० किलोमीटर अंतरावर आहे. पुढील ३ तासांत ते पुदुच्चेरीला धडकेल. वादळाचा वेग हा ११ किमी प्रतितास इतका आहे. या चक्रीवादळाने १४५ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहून शकतात, अशी माहिती चेन्नईतील हवामान विभागाच्या एस. बालाचंद्रन यांनी दिली.

पहाटे ३ वाजेनंतर वादळाची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल. मात्र, गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहणार आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. मदत आणि बचाव कार्यांसाठी आयएनएस ज्योती ही नौदा आधीच तामिळनाडूला पोहोचली असून आयएनएस सुमित्रा विशाखापट्टणमहून रवाना झाली आहे.

निवार चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळ बुधवारी संध्याकाळी ७ वाजेपासून ते उद्या सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे. यापूर्वी २६ उड्डाणे रद्द करण्यात आली होती. चेन्नईमध्ये बर्‍याच ठिकाणी वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या १६ जिल्ह्यांमध्ये २६ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नई, वेल्लोर, कुडलोर, विल्लुपुरम, नागापट्टिनम, तिरुवारूर, चेंगलपट्टू आणि पेरंबलूर या शहरांचा यात समावेश आहे. बेगळुरु आणि आसपासच्या भागातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तामिळनाडूत एक लाखाहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तर पुदुच्चेरीमधून ७ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. निवार वादळाचे अत्यंत गंभीर श्रेणीतील असल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या दोन दिवसांपासून एनडीआरएफची पथकं सज्ज आहेत.तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्रमध्ये २५ पथकं तैनात आहेत. कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं एनडीआरएफचे डीजी एस. एन. प्रधान म्हणाले.

चेन्नईमध्ये सतत पाऊस, करुणानिधींच्या घरात पाणी शिरले

गेल्या २४ तासांपासून चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागामध्ये पाणी तुंबलं आहे. माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या घरातही पाणी शिरलंय. २०१५ च्या पुरातून धडा घेत चेन्नई प्रशासनाने ९० टक्के भरलेल्या चेंबरमबाक्कम धरणाचे दरवाजे उघडले आहेत. या धरणातून १ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पाणी अडयार नदीत जाणार असल्याने नदी काठच्या सर्व सखल भागांना सर्तक करण्यात आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here