मुंबई: राज्य शासकीय कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात उद्या (गुरुवारी) संपावर जात आहेत. मध्यवर्ती संघटनांनी तशी नोटीस शासनाला दिली आहे. त्या अनुषंगाने उद्या होणाऱ्या लाक्षणिक संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. तसा स्पष्ट निर्णय शासनाने घेतला असून याबाबत पत्रक जारी करण्यात आलं आहे. ( Latest News Updates )

वाचा:

संपात सहभागी होणार आहे. संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारीही सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सरकारकडून आधीच कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. केंद्र शासनाचे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने आजच परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे, असेही शासनाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

वाचा:

कोविड काळातील संपाने होणार कोंडी

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी आणि कामगारांसंदर्भातील धोरणांच्या निषेधार्थ केंद्रीय कामगार संघटनांनी गुरुवारी पुकारला आहे. यात १० प्रमुख संघटनांचा सहभाग असून व डाव्या पक्षांशी संबंधित या बहुतांश संघटना आहे. या संपाचा बँकिंग सेवा तसेच शासकीय कार्यालयांच्या सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी आपल्या विविध मागण्या पुढे करत या संपात उतरण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ऐन कोविड काळात हा संप होत असल्याने अनेक आघाड्यांवर कर्मचाऱ्यांअभावी कुचंबणा होईल असे दिसत आहे. ती बाब लक्षात घेऊनच राज्य सरकारने संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here