कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर या फोनची किंमत आता २४ हजार ९९९ रुपये झाली आहे. हा फोन फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केला जावू शकतो. शाओमीच्या हा फोन मर्यादीत कालावधीसाठी उपलब्ध आहे. रेडमीचा ६ जीबी रॅम असलेल्या फोनवर ३ हजार डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. या आधी या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये होती. या फोनमध्ये ६.३८ इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये सोनी IMX586 सेंसरचा ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा टर्शिअरी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फीचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये २७ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times