मुंबई: प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने () शिवसेना आमदार यांचे निकटवर्तीय अमित चंदोल यांना अटक केली आहे. जवळपास १२ तास चौकशी केल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरवण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुपने चंदोल यांच्या कंपनीला दिला होता. या प्रकरणात ही पहिलीच अटक आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावल्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी क्वारंटाइन असल्याने पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती ईडीला केली आहे. ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालये अशा १० ठिकाणी छापेमारी केली होती.
छापेमारीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. छापेमारीच्या वेळी सरनाईक हे परराज्यात होते. ते ठाण्यात परतले आहेत. मात्र, कोविड -१९ नियमांतर्गत ते क्वारंटाइन झाले आहेत. ईडीसमोर चौकशीला हजर राहण्यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times