राज्यातील या महिन्यात एक वर्ष पूर्ण करत आहे. त्या निमित्तानं ‘सामना’चे कार्यकारी संपादक, खासदार यांनी उद्धव ठाकरे यांची खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत महाराष्ट्र सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतानाच राऊत यांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. उद्या प्रसारित होणाऱ्या या मुलाखतीचा प्रोमो राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
वाचा:
नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं. हे सरकार स्थिर होईपर्यंत करोनाची महासाथ आली. चक्रीवादळ आलं. या नैसर्गिक संकटांचा सामना करत असतानाच राज्यात राजकीय घडामोडीही सातत्यानं घडत होत्या. सरकार पडण्याचे मुहूर्त विरोधकांकडून दिले जात होते. आजही ती भाकितं केली जात आहेत. या सगळ्या घडामोडींवर उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत भाष्य केल्याचं प्रोमोतून दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हवर विरोधक सातत्यानं टीका करत असतात. तोच धागा पकडून, ‘मुख्यमंत्री हे हात धुवा असं सांगण्यापलीकडं काय करतात’, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. त्यावर बोलताना, ‘हात धुतो आहे. जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन,’ असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
वाचा:
तुमच्या जीवनात वर्षभरात काय बदल झाले? महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? अशा प्रश्नांची उत्तरे देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहेत. राऊतांनी ट्वीट केलेल्या या प्रोमोमुळं मुलाखतीची उत्सुकता वाढली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times