अहमदाबाद: मसाज पार्लरच्या बॉसच्या पत्नीने केलेल्या एफआयआरविरोधात पार्लरमध्ये काम करणाऱ्या रशियन मसाज थेरपिस्टने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बॉसच्या पत्नीने या रशियन महिलेविरोधात घरगुती हिंसाचार, व्याभिचार, विश्वासघात केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे.

रशियन महिला २०१४ मध्ये भारतात आली. वडोदरा येथील मसाज पार्लरमध्ये ती थेरपिस्ट म्हणून काम करू लागली. वर्षभरानंतर मसाज पार्लरच्या मालकासोबत तिचे जुळले. त्यानंतर ती गरोदर राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला. या रशियन महिलेने बाळाचे वडील म्हणून पार्लरच्या मालकाच्या नावाचा उल्लेख केला होता. रशियन महिलेनेही पार्लरचा मालक मुलाचे वडील असल्याचे सांगितले. त्याला पार्लरच्या मालकाच्या पत्नीने विरोध दर्शवला. तिने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली.

पतीचे रशियन महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधांवरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. संबंधित महिला घटस्फोट घेण्यासाठी पतीवर दबाव टाकत असल्याचा आरोप तिने केला. अखेर त्याच्या पत्नीने न्यायदंडाधिकारी न्यायालयात पती आणि त्याच्या प्रेयसीविरोधात घरगुती हिंसाचार कायद्यान्वये तक्रार केली. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीत तिने जेपी नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात एफआयआर दाखल केला. घटस्फोटासाठी प्रेयसी पतीवर दबाव टाकत असून, बाळाला माझ्या पतीचे नाव देऊन तिला भारतात कायमचे वास्तव्य करायचे असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय, दोघांनी मारहाण केली. तसेच कारही जबरदस्ती घेऊन गेले, असा आरोपही तिने तक्रारीत केला.

दरम्यान, याविरोधात रशियन महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी महिलेविरोधातील कारवाईला स्थगिती देत या प्रकरणी १५ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. दुसरीकडे, मसाज पार्लरच्या मालकानेही न्यायालयात धाव घेतली असून, अटकेच्या शक्यतेपासून अंतरिम संरक्षण देण्याची विनंती केली आहे. यावर न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here