वाचा:
मुंबईत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींच्या उपस्थितीत वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेनं विराट मोर्चा काढला होता. मोर्चाला महिलांनीही मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली.
वाचा:
उपमुख्यमंत्री अजित पवार () यांनी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची महापूजा केली. तो धागा पकडून नांदगावकर यांनी अजितदादांना टोला हाणला. ‘अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीची चावी अजित पवार यांच्याकडं आहे. विठ्ठला, पांडुरंगा… अजित पवारांनी तिजोरीची चावी लवकरात लवकर उघडावी अशी सुबुद्धी त्यांना दे,’ असं नांदगावकर म्हणाले. ‘मागे राज्य सरकारनं एसटी कामगारांना एक हजार कोटी रुपये दिले. पण त्यासाठी जळगाव व रत्नागिरीतील दोन कामगारांना आत्महत्या करावी लागली. आता वीज बिल माफीसाठी देखील सामान्य लोकांनी आत्महत्या करावी का? लोकांनी आत्महत्या केल्यावर तुम्ही वीज बिल माफ करणार आहात का?,’ असा खडा सवाल त्यांनी केला.
वाचा:
‘करोनानंतरच्या लॉकडाऊनमुळं परिस्थिती बिकट आहे. लोकांच्या घरांमध्ये चूल पेटत नाही. कंपन्या बंद पडलेल्या आहेत. नोकऱ्या गेल्या आहेत. पगार नाही. बेरोजगारी वाढतेच आहे. लोक बिल भरणार कुठून? माणुसकी नावाची गोष्ट तुमच्याकडं आहे की नाही? स्वत:ला ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार म्हणवून घेत असाल तर त्या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडू देऊ नका. नाहीतर दुसरे ठाकरे आहेतच हे लक्षात ठेवा. लवकरात लवकर निर्णय घ्या,’ असा इशाराही त्यांनी दिला. ‘ () हे जाणते नेते आहेत. जनमाणसाची नाडी ओळखतात. पवार साहेबांनी ह्या सरकारला सांगावे. त्यांनी सांगितलं तर हे सरकार नक्कीच ऐकेल,’ अशी अपेक्षाही नांदगावकर यांनी व्यक्त केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times