ठाणे: ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख (Jameel Shaikh Murder) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, रोज नवीन माहिती समोर येत आहे. शेख यांची हत्या पूर्वनियोजितच होती, असे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच मारेकऱ्यांनी वापरलेल्या दुचाकीवरील क्रमांक बनावट होता, अशीही माहिती हाती लागली आहे.

प्रकरणात गुन्हे शाखेने शाहिद शेख (वय ३१) याला अटक केली आहे. शेख यांचे मारेकरी ज्या दुचाकीवरून आले होते, त्या दुचाकीचा क्रमांकही बोगस असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शेख यांची हत्या पूर्वनियोजित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाचा:

‘त्या’ दिवशी काय घडलं?

मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची दुचाकीवरून जात असताना भररस्त्यात गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे ठाण्यात खळबळ उडाली होती. शेख हे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी त्यांच्या पाठिमागून दुचाकीवरून दोघे आले होते. त्यातील एकाने शेख यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर शेख दुचाकीवरून खाली कोसळले. परिसरातील लोकांनी शेख यांना तातडीने रुग्णालयात नेले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वाचा:

मारेकरी कोण? पोलीस मागावर

शेख यांच्या हत्येच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शेख दुचाकीवरून जात असताना पाठिमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. दोघा मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार पथके नेमली असून, त्यात गुन्हे शाखेचे पथकही तपास करत आहे. दोघा हल्लेखोरांना पकडणे आतातरी महत्वाचे आहे. त्यांना अटक केल्यानंतर हत्येमागील अन्य कारणांचा तपास करू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात शाहिद शेख याला अटक केली आहे.

पाहा: हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here