सामनाला दिलेल्या मुलाखतीत यांनी महाराष्ट्र सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतानाच राऊत यांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. ‘सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू,’ असा सूचक इशाराही विरोधकांना दिला आहे. यावरून भाजपनं मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर या मुलाखतीवरुन हल्ला चढवला आहे.
‘महाराष्ट्राचं हे दुर्देव आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी दमबाजीची भाषा करतात. राज्याचे मुख्यमंत्रीच दात पाडणे, धमक्या देण्याची भाषा करतात हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेच्या विरोधातलं आहे आणि ते मुख्यमंत्री आहेत की एखाद्या गल्लीतच्या पक्षाचे प्रमुख?,’ असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
‘तुमच्या अंगावर येऊ, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत, असं मुख्यमंत्री म्हणतात. मी त्यांना आठवण करुन देऊ इच्छिता मुलं बाळ आम्हालाही आहेत. पण आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो, अशा भ्रमात त्यांनी राहू नये. राज्याच्या सुव्यवस्थेकडे त्यांनी लक्ष द्यावं, भाजपला धमक्या देण्याच्या प्रयत्न त्यांनी करु नये, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times