जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे यातील एका चालकाने पोलिसांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नगरसेवक व ठेकेदार यांच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवताना वाळू वाहतूक करणारे पाच डंपरदेखील पकडण्यात आले आहेत. ( Girna River Latest News Updates )

वाचा:

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक यांनी दोन दिवसांपूर्वी गिरणा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. त्यानसुार आज धरणगाव तालुक्यातील बांभोरी परिसरातील गिरणा नदी पात्रात पथकाने कारवाई केली. पोलीस पथकाने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून पहाटे अडीच ते साडेपाचपर्यंत अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी नदीपात्रात सापळा रचला. यावेळी पाच डंपरवरील चालक प्रमोद सुभाष चव्हाण (रा. सावदे, ता.एरंडोल), अनिल योगराज सपकाळे (रा. आव्हाने ता. जळगाव), भगवान सोमा सोनवणे (रा. बांबोरी, धरणगाव), सचिन शंकर पाटील (रा. शेंदुर्णी, ता. जामनेर), सिद्धार्थ अशोक अहिरे (रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल), मोटारसायकलवरील वॉचर म्हणून काम करणारे दोन जण मुकुंदा राजू पाटील (रा. वैजनाथ, ता. एरंडोल), दीपक धनराज पाटील (रा. वैजनाथ, ता. एरंडोल) अश्यांना ताब्यात घेण्यात आले. यातील डंपर चालक सिद्धार्थ अहिरे याने पोलिसांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही. ताब्यात घेतलेले डंपर तहसील कार्यालय धरणगाव येथे सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात आले आहेत.

वाचा:

नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी सर्वांना एकत्र आणून त्यांना संघटित गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त केले, असे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात त्यांच्यासह एकूण १२ आरोपींविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर २५ लाख १८ हजाराचा एकूण ऐवज जप्त करण्यात आला असून त्यात ५ डंपर, १ ब्रास वाळू, मोटारसायकल, मोबाइल असा ऐवज आहे. यात पाच चालक व मोटरसायकलवरील दोन पंटर यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.

दरम्यान, गिरणा काठावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून शासनाचा महसूल बुडविला जातो. त्याला आळा घालण्यासाठी यापुढे नदीपात्राजवळ फिरणाऱ्या डंपर, ट्रॅक्टर, मोटरसायकल यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा व मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here