मुंबई: सध्या अजय देवगणच्या ” चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्लाझा थीएटरमध्ये हा चित्रपट पाहणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट आजच्याऐवजी नंतर पाहण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई महानगरपालिका निर्मित ‘वाइल्ड मुंबई’ चित्रफितीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपण ‘तान्हाजी’ चित्रपट आज पाहणार नाही, असे स्पष्ट केले. आज मी अजय देवगणसोबत तान्हाजी चित्रपट पाहणार, अशा बातम्या आल्या होत्या मात्र, मी आज नाही तर नंतर माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत हा चित्रपट नक्की पाहणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत वाढत असलेल्या काँक्रिटीकरणावरही यावेळी चिंता व्यक्त केली. मुंबई शहराला निसर्गाचे सुंदर देणे लाभले असताना त्याचा सर्वांना विसर पडत चालला आहे. सध्या सगळेच चटईक्षेत्राच्या मागे लागले आहेत, असा चिमटा घेत मुंबईचा निसर्ग जपण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

‘तान्हाजी’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड

अजय देवगणचा सिनेमा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण होत आले तरी सिनेमाची क्रेझ कायम आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. ११ दिवसांत ‘तान्हाजी’ने १७५.६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कमाईचा आलेख असाच राहिला तर लवकरच हा सिनेमा २०० कोटी क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here