पुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी येत्या शनिवारी (दि. २८) पंतप्रधान ‘’ला भेट देण्यासाठी पुण्यात येणार आहेत. दरम्यान, १०० देशांचे राजदूतही चार डिसेंबर रोजी याच कारणासाठी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे निश्चित झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून या दोन्ही दौऱ्यांबाबतचे पत्र आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले असल्याने या दौऱ्यांची तयारी सुरू करण्यात आली आहे. ( to visit ‘s Of India on Saturday )

वाचा:

पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्युट’मध्ये अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन घेण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या लसीचे वितरण करण्याबाबत बैठका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याला महत्त्व आले आहे. पंतप्रधान मोदी हे शनिवारी दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत ‘ सीरम इन्स्टिट्युट ’ला भेट देणार आहेत. या कालावधीत ते लसीचा आढावा घेणार आहेत.

लसीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी १०० देशांचे राजदूतही ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देणार आहेत. राजदूतांचा दौरा २८ नोव्हेंबरला नियोजित करण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे तारखेत बदल करण्यात आला असून, राजदूत हे चार डिसेंबरला येणार आहेत.‘पंतप्रधान मोदी हे २८ नोव्हेंबरला, तर राजदूत हे चार डिसेंबरला येणार असल्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे’, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

वाचा:

असा असेल दौरा

– लोहगावमधील टेक्निकल एअरपोर्ट येथे दुपारी साडेबारा वाजता होणार आगमन
– लोहगावमधून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्यूट येथे आगमन
– सीरम इन्स्टिट्यूटला दुपारी एक ते दोन या कालावधीत भेट
– पुण्याहून हैदराबादकडे होणार रवाना

…म्हणून पंतप्रधानांचा पुणे दौरा महत्त्वाचा

करोनावरील लसची प्रतीक्षा देशात आणि जगात सर्वांनाच आहे. अनेक देशांत लस निर्मितीवर काम सुरू आहे. लसीची चाचणीही घेण्यात येत आहे. भारतातही लसचाचणी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माहिती दिली होती. लसीची सद्यस्थिती सांगतानाच लसची किंमत आणि डोसचे प्रमाण याबाबत निश्चिती होणे बाकी असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. त्या अनुषंगाने पंतप्रधानांचा पुणे दौरा महत्त्वाचा ठरणार असून याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here