सांगली: तालुक्यातील मांगले येथील गंधा नर्सिंग होममध्ये उपचारासाठी गेलेल्या चोरट्याने दवाखाना बंद असल्याचे पाहून दवाखान्यालगत असलेल्या डॉक्टरच्या घरात चोरी केली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. २९ तोळे सोन्याचे दागिने, ५० भार चांदी आणि ५० हजार रुपयांची रोकड लांबवणाऱ्या चोरट्याला शिराळा पोलिसांनी बारा तासांत अटक केली आहे. राहुल उत्तम देवकर (वय ३४, रा. मांगले) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. देवकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरटा आहे. ( Latest News Updates )

वाचा:

शिराळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगले येथे यांच्या गंधा नर्सिंग होमच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने लॉकरमधील २९ तोळे सोने, दहा भार चांदी आणि रोख ५० हजार रुपयांवर डल्ला मारला होता. बाहेरगावाहून परतल्यानंतर बुधवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच डॉ. पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. चोरीच्या पद्धतीवरून चोर परिसरातीलच असावा, असा संशय पोलिसांना होता. यानुसार त्यांनी रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांची चौकशी सुरू केली. दरम्यान, शिराळा येथील सिद्धनाथ ज्वेलर्समध्ये हा सराईत चोरटा चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याच्या बांगड्या आणि अंगठ्या मिळाल्या. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने डॉ. पाटील यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली.

वाचा:

तब्येत बरी नसल्याने मंगळवारी रात्री राहुल देवकर हा डॉ. पाटील यांच्या दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेला होता. दवाखान्याला कुलूप असल्याचे पाहून तो पाठीमागील बाजूने दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरला. घरातील लॉकरमधील सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह ५० हजारांची रोकड त्याने लंपास केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील २९ तोळे दागिने, ५० भार चांदी आणि २० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी अवघ्या बारा तासांत घरफोडीच्या गुन्ह्याची उकल केली. इस्लामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, विनोद जाधव, चंद्रकांत कांबळे, कालिदास गावडे, अरुण कानडे, नितीन यादव, अभिजित पवार, आदींनी ही चोरी उघडकीस आणली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here