मुंबई: , , व दिल्ली या चार राज्यांतून येणाऱ्या विमान प्रवाशांमध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंत एकही प्रवासी पॉझिटिव्ह आढळलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा २०० प्रवाशांची तपासणी पूर्ण झाली आहे. ( Latest News Updates )

वाचा:

मुंबईच्या विमानतळावर आगमन होणाऱ्या प्रवाशांच्या जलद करोना चाचणीची (आरटी-पीसीआर) सोय ६ सप्टेंबरपासूनच करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ऑक्टोबरअखेरपर्यंत सुमारे ८ हजार प्रवाशांची चाचणी झाली. त्यात जेमतेम १०० प्रवासी पॉझिटिव्ह सापडले. पण आता राज्य सरकारच्या आदेशानुसार राजस्थान, गोवा, गुजरात व दिल्लीहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडे चाचणीचा ‘निगेटिव्ह’ अहवाल अत्यावश्यक आहे. ज्यांच्याकडे असा अहवाल नसेल त्यांनी विमानतळावर चाचणी करून घेणे अनिवार्य आह. या चाचणीसाठी विमानतळ प्रशासनाने विमानतळावर विशेष कक्ष तयार केला आहे. त्या कक्षात जाऊन प्रवाशांना ही तपासणी करता येत आहे. वरील चार भागांतून येणाऱ्या अशा २०० प्रवाशांची आतापर्यंत चाचणी घेण्यात आली आहे. त्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही.

वाचा:

तीन प्रवासी करोना बाधित

वरील स्थानकांत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांतील १३,२५३ प्रवाशांची गुरुवारी दिवसभरात तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६१९ प्रवाशांची करोना चाचणी केली असता त्यात तीन प्रवासी करोना बाधित सापडले. राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here