नवी दिल्लीः भारत बायोटेकची लसची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी गुरुवारी दिल्लीच्या एम्समध्ये सुरू झाली. एम्स न्यूरोसाइन्स सेंटरचे प्रमुख डॉ. एम.व्ही. पद्म श्रीवास्तव ( ) आणि इतर तीन व्हॉलिंटिअर्सना पहिला डोस देण्यात आला. भारत बायोटेक ( ) ही भारतीय कंपनी आहे. ही कंपनी Covaxin नावाने करोना लसीवर काम करत आहे. भारत बायोटेक ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या सहकार्याने विकसित करत आहे.

याआधी हरयाणाच्या रोहतकमध्ये शुक्रवारी कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली. देशातील एकूण २५ हजार ८०० जणांवर या लसीची चाचण्या घेण्यात येणार आहे. लसीचे दोन डोस असतील. पहिला डोस दिल्याच्या २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. हैदराबाद, गोवा आणि पीजीआय रोहतकमध्ये २००-२०० व्हॉलिंटिअर्सना पहिल्या डोसच्या दिल्याच्या २८ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.

२०२१ च्या पहिल्या तिमाहीत लाँच करण्याचे लक्ष्य

भारत बायोटेकने २०२१ च्या पहिल्या तिमाहीत कोव्हॅक्सिन लस लाँच करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तिसर्‍या टप्प्यातील अपेक्षित निकालानंतर त्यावर पुढील काम केलं जाईल. लसीच्या चाचणीचा चौथा टप्पा देखील सुरू ठेवू. याशिवाय आम्ही आमच्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात प्रभावी सुरक्षा डेटा स्थापित केला तर २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ही लस सुरू करण्याचं लक्ष्य आहे, असं भारत बायोटेकचे अध्यक्ष साई प्रसाद यांनी सांगितलं.

कोव्हॅक्सिन कमीतकमी ६० टक्के प्रभावी असेल. तर डब्ल्यूएचओ, यूएस एफडीए (फूड अ‍ॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) आणि अगदी भारताच्या सीडीएससीओने कोव्हॅक्सिन ५० टक्के परिणामकार असेल अशी अपेक्षा व्यक्त केलीय. तर कोव्हॅक्सिन ६० टक्के प्रभावी ठरण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे, असं साई प्रसाद यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here