नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग ( ) आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर ( ) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना एमएसपीसंदर्भात कोणतीही अडचण आली तर राजकारण सोडून देईन, असं विधान मनोहर लाल खट्टर यांनी केलं आहे.

हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ‘पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना यापूर्वीही आपण बोललोय आणि आता पुन्हा सांगतो. एमएसपीवर शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आली तर राजकारण सोडून देईन. यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी निरपराध शेतकऱ्यांना चिथावणं बंद करावं, असं खट्टर म्हणाले.

‘गेल्या ३ दिवसांपासून अमरिंदर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण दुर्दैवाने तुम्ही संपर्कात न येण्याचं निश्चित केलंय. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही किती गांभीर आहात हे दिसून येतंय ना? तुम्ही फक्त ट्विट करत आहात आणि चर्चेपासून पळ काढत आहात. तुम्ही हे कशासाठी करताय? ‘, असा सवाल खट्टर यांनी अमरिंदर सिंग यांना केला.

फसव्या, खोट्या आणि प्रोपगेंडा करण्याची तुमची वेळ संपली आहे. जनतेसमोर आता तुमचा खरा चेहरा येणार आहे. करोना साथीच्या काळात नागरिकांचे जीव धोक्यात घालणं थांबवा. त्यांच्या जीवाशी खेळू नका, असा आपल्याला आग्रह करतो. कमीतकमी करोना संकटाच्या या काळात इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण तरी करू नका, असं म्हणत खट्टर यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर हल्ला चढवला आहे.

खट्टर यांच्यावर अमरिंदर सिंग यांचा पलटवार

हरयाणा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पलटवार केला आहे. शेतकऱ्यांवर तुम्ही दिलेली प्रतिक्रिया चकीत करणारी आहे. शेतकऱ्यांमध्ये एमएसपीबाबत विश्वास निर्माण करायचा आहे. दिल्ली चलो आंदोलनापूर्वी तुम्ही शेतकऱ्यांशी बोलायला पाहिजे होते. तुम्हाला वाटत असेल की मी शेतकर्‍यांना चिथावतोय, तर मग हरयाणाचे शेतकरी दिल्लीकडे कूच का करत आहेत?, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी खट्टर यांच्यावर निशाणा साधला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here