‘शिवसेना नेते यांच्या चौकशीच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही. अशाप्रकारे लक्ष्य करण्याच्या प्रकाराला भाजप जराही घाबरत नाही. भाजपच्या नेत्यांचा कारभार स्पष्ट आणि स्वच्छ आहे. त्यामुळे जनाधार भाजपला मिळाला आहे’, असे प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी गुरुवारी दिले.
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, ‘आधी तुम्हाला काय चौकशा करायच्या त्या करून घ्या. मग तुमच्या १०० नव्हे, १२० नेत्यांची यादी आपण देऊ’, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर, ‘संजय राऊत यांनी यादी देऊ, असे बोलून दोन दिवस झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राऊत यांना तात्काळ यादी देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यादी देण्यासाठी मुहूर्त बघू नये. तात्काळ यादी देऊन टाका. उशीर करू नका नाहीतर आपण बोलघेवडे आहात असा त्याचा समज होईल. सत्य जनतेपुढे येऊ द्या’, असे आवाहन दरेकर यांनी दिले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times