कल्याण:
मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा मार्गावर आज मंगळवारी सायंकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. या मार्गावरील सिग्नलची वायरच चोरट्यांनी तोडून चोरून पोबारा केला. परिणामी प्रवाशांना फटका बसला. या मार्गावरील रेल्वे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

मंगळवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी सिग्नलची वायर चोरल्याने ७.२० ते ९.२० या वेळेत दोन सिग्नलमध्ये बिघाड झाला होता. रेल्वे वाहतुकीवर ऐन गर्दीच्या वेळी यामुळे परिणाम झाला. या प्रकरणाचा आरपीएफचं पथक तपास करत आहे.

दरम्यान, आजच मंगळवारी सकाळी डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकादरम्यान इंजिनात बिघाड झाल्यानेही वाहतूक विस्कळीत झाली होती. राजेंद्र नगर- पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यानं कल्याणहून मुंबईकडे येणारी जलद वाहतुकीवर परिणाम झाला होता. जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ नयेत यासाठी जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here