संभल : उत्तर प्रदेशच्या सरकारी रुग्णालयांतील ढिसाळ कारभार एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एका सरकारी रुग्णालयात स्ट्रेचरवर ठेवलेल्या एका चिमुरडीच्या मृतदेहाचे कुत्र्यानं लचके तोडल्याची घटना समोर आलीय. या घटनेचं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय.

अंगावर शहारे उभं करणारं हे दृश्य रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार वर्तन दर्शवण्यासाठी पुरेसं ठरतंय.

एका रस्ते अपघातात संबंधित अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

या मुलीचा मृतदेह एका सफेद कपड्यात गुंडाळून रुग्णालय इमारतीच्या परिसरातच पायऱ्यांच्या खाली एका स्ट्रेचरवर ठेवण्यात आला होता.

वाचा : वाचा :

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दुर्दैवी मुलीच्या वडिलांनी ‘रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जवळपास दीड तासांपर्यंत मुलीला कुणीही हातदेखील लावला नव्हता’, असं म्हणत रुग्णालय प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप केलाय.

रुग्णालय प्रशासनानं मात्र आरोपांचा इन्कार केलाय. या परिसरात वेबारस कुत्र्यांचा वापर आणि धोका आहे. यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र लिहून कारवाईची मागणीही करण्यात आली आहे परंतु, कोणताही कारवाई झाली नाही, असं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलंय.

मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबानं पोस्टमॉर्टेमसाठी नकार दिला होता. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला होता आणि कुटुंबही मृतदेह घरी घेऊन जाण्याच्या तयारीत होतं. परंतु, काही वेळेसाठी त्यांनी मृतदेह तिथेच ठेवला होता. ही घटना घडली तेव्हा आसपास कुणीही नव्हतं, असंही रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे.

या प्रकरणात कारवाई करत रुग्णालय प्रशासनानं एक स्वीपर आणि एका वॉर्ड बॉयला निलंबत केलंय. मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी मात्र या घटनेसाठी आपल्याला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, असा दावा केलाय.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here