उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिची कारवाई बेकायदेशीर ठरवली आहे. महापालिकेनं बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करताना ते कार्यालय पूर्ववत करुन द्यावे असा आदेश महापालिकेला दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भातखळकर यांनी ट्विटकरत ठाकरे सरकारला घेरलं आहे. तसंच, कंगनाच्या कार्यालयाच्या नुकसानीचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या खिशातून करावा, या सुडाच्या राजकारणाचा भुर्दंड सरकारी तिजोरीतून कशाला, असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं अर्णब गोस्वामीपाठोपाठ पुन्हा एकदा ठाकरे सरकारचं थोबाड फुटले आहे. कंगनाला नुकसानभरपाई द्यावी लागणं हे सरकारच्या सुडाच्या राजकारणावर प्रकाश टाकणारं आहे. या सगळ्या कारवाई मागचा बोलावता धनी राज्याच्ये मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याचे प्रायश्चित्त घ्यावे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times