मुंबई: अभिनेत्री हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं केलेली कारवाई उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवल्यानंतर कंगनानं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करतानाच तिनं टीकाकारांना जोरदार टोला हाणला आहे.

वाचा:

न्यायालयाचा निर्णय ट्वीट करत कंगनानं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा माझा एकटीचा विजय नाही. लोकशाहीचा विजय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते, तेव्हा तो तिचा एकटीचा विजय नसतो, लोकशाहीचा विजय असतो,’ असं तिनं म्हटलं आहे. या लढाईत पाठबळ देणाऱ्यांचे तिनं आभार मानले आहेत. त्याचबरोबर, टीकाकारांना उपरोधिक शब्दांत सुनावलं आहे. माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यानंतर त्यावर हसणाऱ्यांचेही मी आभार मानते. तुम्ही व्हिलनची भूमिका पार पाडलीत, म्हणूनच मी आज हिरो होऊ शकले, असं तिनं म्हटलं आहे.

वाचा:

काय आहे प्रकरण?

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व राज्य सरकारवर संशय घेणाऱ्या कंगनाचा सत्ताधारी शिवसेनेशी वाद झाला होता. शिवसेनेनं कंगनाच्या विरोधात आंदोलन केलं होतं. तर, कंगनानं मुंबई ‘पाकव्याप्त काश्मीर’सारखी झालेय, असं वक्तव्य केलं होतं. भाजपचे नेते कंगनाच्या बाजूनं उतरल्यानं हा वाद आणखी चिघळला होता. दोन्ही बाजूंकडून शाब्दिक युद्ध सुरू असतानाच मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर कारवाई करून तेथील बेकायदा बांधकाम पाडलं होतं. या कारवाईला कंगनानं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

वाचा:

न्यायालयानं आज कंगनाच्या बाजूनं निर्णय देत मुंबई महापालिकेची कारवाई बेकायदा ठरवली. ‘महापालिकेनं केलेली कारवाई ही अत्यंत घाईनं आणि वाईट हेतूनं केल्याचं स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इशारा दिल्यानंतर महापालिकेनं तत्परतेनं ही कारवाई केली. यातून प्रशासनाचा कुहेतू स्पष्ट दिसतो. कायद्याचं पालन न करता वैयक्तिक द्वेषापोटी कारवाई केली हे स्पष्ट होतं, असं निरीक्षण न्यायालायनं नोंदवलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here