मुंबईत महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर अनेदका त्यांच्यासोबत लहान मुलंही प्रवास कराताना दिसत आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसोबत प्रवास करणे धोक्याचे ठरत आहेत. तसंच, प्रशासनानं फक्त महिलांनाच लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता लोकल प्रवास नाकारण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयानुसार मुंबईतील रेल्वे स्टेशनच्या गेटजवळ आरसीएफ जवान तैनात करणार आहे. या आरसीएफ जवानाकडून महिलांची तपासणी करण्यात येईल जर महिलांसोबत लहान मुलं आढळलं तर त्या महिलेला लोकल प्रवासाची परवानगी मिळणार नाहीये. त्या महिलांना रेल्वे स्थानकातूनच पुन्हा घरी पाठवण्यात येईल, असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु झाली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात वाजेपासून पुढे शेवटच्या लोकलपर्यंत महिला प्रवासी प्रवास करू शकतात. वैध तिकिटासह महिला प्रवासी करु शकणार आहेत यासाठी क्यू-आर कोडची आवश्यकता भासणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे
दरम्यान, सध्या रेल्वेकडून एकूण २७७३ फेऱ्या चालवण्यात येत आहे. मध्य रेल्वेवर ५५२ तर पश्चिम रेल्वेवर २०१ फेऱ्यांची वाढ करण्यात आली. या लोकल फेऱ्यांमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि महिला प्रवाशांना प्रवासाची मुभा असणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times