वाचा:
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीचा घोळ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे दिलेली यादी भाजपच्या नेत्यांमुळे प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. आणि राजू शेट्टी यांची नावे वगळली जाण्याची चर्चाही सुरू झाली. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरूच असताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी नव्या १२ नावांची यादी राज्यपालांकडे सादर केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र राज्यपाल योग्य निर्णय घेतील, असा आशावाद व्यक्त केला आहे.
वाचा:
सांगली येथे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, ‘मंत्रिमंडळाने १२ नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. याबाबत १५ दिवसात निर्णय जाहीर करावा, असे पत्र मंत्रिमंडळाने राज्यपालांना पाठवले आहे. मंत्रिमंडळाने दिलेली यादी राज्यपाल डावलत नाहीत, अशी प्रथा आहे. राज्यपाल स्वतंत्र विचारांचे आहेत. यादीला मान्यता देण्याचे संकेत ते पाळतील, अशी आशा आहे.’ दरम्यान, त्यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, ‘राज्यातील सर्व प्रथा आणि परंपरा मोडीत काढण्यात भाजपचा हातखंडा आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीची प्रथा मोडण्यास त्यांनी हातभार लावू नये.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times