बीजापूर:
केंद्रीय राखीव पोलीस बल () च्या जवानांनी मंगळवारी एका गर्भवती महिलेला मदत करून समाजासमोर एक चांगलं उदाहरण ठेवलं. छत्तीसगड राज्यातील बीजापूर जिल्ह्यात पडेडा गावात गाडी उपलब्ध नसल्याने या महिलेला जवानांनी पालखी करून मुख्य रस्त्यापर्यंत नेले. गाव ते रस्त्यापर्यंतचा सहा किलोमीटरच्या मार्गावर त्यांनी खांद्यावरून या महिलेला खाटेची पालखी करत नेलं.

मिळालेल्या माहितीनुसार, ८५ वी बटालियन पडेडाच्या जंगलात गस्त घालत होती. या जवानांनी गावकऱ्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांना कळलं की एक गरोदर महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या आहेत आणि रुग्णालयात नेण्याची आवश्यकता आहे. हे ऐकताच त्यांनी जराही वेळ न दवडता महिलेच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला.

या गावात सीआरपीएफची पथकं नेहमी जात असतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. महिलेसंदर्भातली माहिती कळल्यावर कमांडर अविनाश राय फर्स्ट एड एक्सपर्टसह महिला बूदी हिच्या घरी पोहोचले. तिला प्रसवकळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तिला तत्काळ रुग्णालयात नेण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यात आल्या. पडेडा गावात कोणतंही आरोग्य केंद्र नाही. शिवाय रस्ता नसल्याने गाडी किंवा अॅम्ब्युलन्स आणण्याचीही सोय नाही. तिला मुख्य रस्त्यापर्यंत आणून बीजापूरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here