मुंबई: एखाद्या नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केली तरी सरकार आणि प्रशासनाने त्याकडं दुर्लक्ष करणंच सोईस्कर असतं. ती वक्तव्ये कितीही त्रासदायक असली तरीही प्रशासन कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन आणि कुहेतूने कारवाई करू शकत नाही,’ असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयानं आज नोंदवलं. (Bombay High Court Observations)

वाचा:

मुंबई महापालिकेनं अभिनेत्री ( Case) हिच्या मुंबईतील कार्यालयावर केलेली तोडकामाची कारवाई वैध होती की अवैध होती यावर आज न्यायालायनं निकाल दिला. ही कारवाई अत्यंत घाईनं व वाईट हेतूनं व सूडबुद्धीनं केल्याचं स्पष्ट दिसत आहे. कायद्याचं पालन न करता वैयक्तिक द्वेषापोटी ही कारवाई केली गेली. त्यामुळं ती बेकायदा आहे, असा निर्णय न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं दिला.

वाचा:

कंगना राणावत हिनं मुंबई, मुंबई पोलीस, राज्य सरकार व शिवसेनेबद्दल आक्षेपार्ह मतं व्यक्त केल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. त्याची परिणती कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईत झाली होती. कंगनानं या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

वाचा:

या प्रकरणी निर्णय देताना न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. कोणत्याही नागरिकानं कितीही बेजबबादार वक्तव्य केली तरी सरकार व प्रशासनानं त्याकडं दुर्लक्ष करणं सोयीचं ठरतं. कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार त्याच्यावर कारवाई करू शकत नाही, असं खंडपीठानं स्पष्ट केलं. त्याचवेळी, मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ म्हणणाऱ्या व विशिष्ट व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या कंगना राणावत हिला देखील खंडपीठानं समज दिली. कंगनाने भविष्यात असं ट्वीट करणं टाळावं, असंही न्यायालयानं सांगितलं.

‘हायकोर्ट कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला पाठबळ किंवा प्रोत्साहन देत नाही आणि त्याचबरोबर व्यक्ती, सरकारी प्रशासन किंवा सरकारविरोधातील बेजबाबदार विधानांनाही मान्यता देत नाही. राज्यातील परिस्थिती, राज्य पोलिस किंवा सिनेसृष्टीत असलेल्या कथित वातावरणाविषयी याचिकादार कंगना राणावतने जी काही नकारात्मक विधाने केली, ती खरी असल्याचे आम्ही मानत नाही. या संदर्भात आम्हाला एवढेच वाटते की, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती म्हणून सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या कोणत्याही विषयावर कोणत्याही सार्वजनिक मंचावर आपले विचार मांडताना जबाबदारीचे भान ठेवून व मर्यादेत राहून बोलायला हवे,’ असा सल्लाही न्यायालयानं कंगनाला दिला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here