: सताळा येथील राधागोविंद सेवा मिशन आश्रमावर दरोडा टाकून स्वामी व त्यांच्या साधकांना मारहाण करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले गजाआड केले. संशयितांकडील दोन कार, चाकू, सात मोबाइलसह एकूण १४ लाख २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

लाडसावंगी रस्त्यालगत सताळा गावच्या हद्दीत डोंगरावर प्रियशरण महाराजांचे आश्रम आहे. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या आश्रमात घुसून सात ते आठ जणांनी हल्ला चढवला होता. हल्लेखोरांनी सुरुवातीला आश्रमाचा दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला. पहाटेच्या सुमारास हा हल्ला झाला होता. अचानक झालेल्या हल्ल्याने सगळेच घाबरले होते. तळमजल्यावर असलेल्या साधकांना त्यांनी महाराजांबाबत विचारणा केली होती. त्यानंतर वरच्या मजल्यावर असलेल्या महाराजांवर त्यांनी हल्ला केला. त्यांच्यावर चाकूने वार केले. यात महाराज जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हल्ला करण्याचे कारण काय? चौकशीतून होणार उघड

सात ते आठ जणांच्या टोळक्याने पहाटेच्या सुमारास अचानक आश्रमावर हल्ला चढवला. त्यानंतर महाराज आणि साधकांना मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात आश्रमातील कोणतीही वस्तू किंवा ऐवज चोरीला गेलेला नव्हता. त्यामुळे हल्ल्याचे कारण समजू शकले नव्हते. या घटनेच्या १५ ते १६ दिवसांनी हल्लेखोरांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडील लाखोंचा ऐवज जप्त केला आहे. संशयित आरोपींच्या चौकशीतून हल्ल्यामागील कारण स्पष्ट होणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here