मुंबईः अभिनेत्री हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं केलेली कारवाई उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवल्यानंतर शिवसेना नेते यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री कंगनानं मुंबई पोलिसांचा उल्लेख माफिया असा केला मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली. कंगनाला कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर उत्साही झालेल्या भाजपाला हे मान्य आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, कोर्टाच्या निर्णयाविरोधात किंवा न्यायाधीशांविरोधात काही बोलणं हा न्यायालयाचा अपमान ठरतो. पण, मग महाराष्ट्र आणि मुंबईबाबत कोणी अशी व्यक्तव्य करत असेल तर ती बदनामी नाही का?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणावरुन अभिनेत्री कंगना राणावतनं मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच, मुंबईबाबतही अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत कंगनाच्या विरोधात आंदोलनं केलं होतं. त्यानंतर कंगनानंही शिवसेनेचा आव्हान दिलं होतं. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी कंगनाच्या बाजूनं उतरल्यानं हा वाद आणखी चिघळला होता. दोन्ही बाजूंकडून शाब्दिक युद्ध सुरु असतानाच मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर कारवाई करुन तेथील बेकायदा बांधकाम पाडलं होतं. या कारवाई प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालायाने निकाल दिला असून ही कारवाई अवैध असल्याची निकाल दिला आहे.

कंगनाला न्यायालयाकडून समज

‘मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे किंवा विशिष्ट व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे किंवा सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला हायकोर्ट कोणत्याही प्रकारे मान्यता देत नाही. त्याच्याशी हायकोर्ट सहमत नाही. कंगनाने भविष्यात असे ट्विट करण्यापासून स्वतःला रोखावे,’ अशी समज न्यायालयानं कंगनाला दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here