मुंबई : आज सकाळी सकारात्मक सुरुवात करणाऱ्या सोने आणि चांदीमध्ये सध्या विक्रीचा सपाटा सुरु आहे. दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी आकडेवारीनंतर कमॉडिटी बाजारात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला. त्यामुळे सोने ७०० रुपयांनी घसरले.

आज दिवसभरात सोन्याचा भाव ४८ हजारांखाली घसरला. सोने प्रती १० ग्रॅम ४७८०० रुपये इतके खाली आले होते. तर चांदीने ५८००० रुपयांची पातळी तोडली. एक किलोला ५७८७७ रुपये इतका खाली आला होता. सध्या एमसीएक्सवर सोने ४८००० रुपये प्रती १० ग्रॅम असून त्यात ५१७ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ५८८११ रुपये असून त्यात १०६२ रुपयांची घसरण झाली आहे.

goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६६० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४८६६० रुपये आहे. पुण्यात २२ कॅरेटचा भाव ४७६६० रुपये असून २४ कॅरेटसाठी आजचा सोन्याचा भाव ४८६६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४७५०० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१८१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ४९८०० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५२००० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४५८९० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५००५० रुपये आहे.

जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस १८०५.५० डॉलर आहे. चांदीचा भाव २३.३६ डॉलर आहे. गुरूवारी अमेरिकेत कमॉडिटी बाजार बंद होता.

करोना व्हायरसशी दोन हात करताना आर्थिक आघाड्यांवर घेतलेल्या निर्णयाने अर्थचक्राला चालना देण्यात केंद्र सरकारला काही प्रमाणात यश आले असले तरी दुसऱ्या तिमाहीचे विकासदराचे आकडे चिंताजनक आहे. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर (
) उणे ७.५ टक्के इतका राहिला आहे. तर एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीने ऐतिहासिक उणे २३.९ टक्क्यांचा स्तर गाठला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here