मुंबईः न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. बीसीसीआयने वनडे आणि टी-२० या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून वनडे सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त झालेल्या शिखर धवनच्या जागी पृथ्वी शॉला संधी मिळाली आहे. तर टी-२० च्या संघात शिखर धवनच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावर असताना पाच सामन्यांची टी-२० मालिका, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. टी-२० मालिकेसाठी कर्णधारपद विराट कोहलीकडेच असून, रोहित शर्मा उपकर्णधार असेल. यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आली आहे. २४ जानेवारी रोजी पहिला टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे.

वन डे साठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), , केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दूबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, महम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि केदार जाधव

टी-२० साठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), संजु सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दूबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर

असा आहे भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा

>> टी-२० मालिका

पहिली टी-२० : ऑकलंड- २४ जानेवारी २०२०
दुसरी टी-२०: ऑकलंड- २६ जानेवारी २०२०
तिसरी टी-२०: हॅमिल्टन- २९ जानेवारी २०२०
चौथी टी-२०: वेलिंग्टन- ३१ जानेवारी २०२०
पाचवी टी-२०: माऊंट माउंगानुई- ०२ फेब्रुवारी २०२०

>> वनडे मालिका

पहिली वनडे: हॅमिल्टन- ०५ फेब्रुवारी २०२०
दुसरी वनडे: ऑकलंड-०८ फेब्रुवारी २०२०
तिसरी वनडे : माऊंट माउंगानुई- ११ फेब्रुवारी २०२०

न्यूझीलंड अ संघाविरुद्ध ३ दिवसाचा सराव सामना: हॅमिल्टन- १४ ते १६ फेब्रुवारी

>> कसोटी मालिका

पहिली कसोटी: २१ ते २५ फेब्रुवारी- वेलिंग्टन
दुसरी कसोटी: २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च- ख्राइस्टचर्च

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here