मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने पुण्यात अविनाश भोसले यांच्या काही ठिकाणांवर छापे मारले होते. त्यानंतर ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यानुसारच भोसले आज सकाळी मुंबईतील ईडी कार्यालयात पोहचल्याचे सांगण्यात येत आहे. विदेशी चलन प्रकरणात फेमा () कायद्यांतर्गत भोसले यांची चौकशी करण्यात आली व त्याच्याकडील कागदपत्रांचीही छाननी करण्यात आली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अविनाश भोसले हे राज्यमंत्री यांचे सासरे आहेत. यापूर्वीही अनेक कारणांनी त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात भोसले यांचा दबदबा राहिला आहे. याआधी आयकर विभागाकडूनही भोसले यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times