पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देतील. सीरमने कोविड -१९ या लसीवर अॅस्ट्रॅझेनेका या ब्रिटीश कंपनीशी करार केला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबादमधील भारत बायोटेक सेंटरला भेट देण्याचीही अपेक्षा आहे. भारत बायोटेक स्वदेशी लस कोव्हॅक्सिन विकासावर काम करत आहे. पंतप्रधान मोदी कोविड -१९ लसीच्या विकासाची माहिती घेतील. झायडस कॅडिलाचे केंद्र अहमदाबाद शहरातील चांगोदर औद्योगिक क्षेत्रात आहे, असं गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले.
कोविड -१९ वरील झिकोव्ह-डी या लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. तसेच ऑगस्टपासून मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पादेखील सुरू झाला आहे, असं औषध उत्पादक झायडस आधीच स्पष्ट केलंय. पंतप्रधान मोदींचा गुजरात दौरा अगदी थोडक्यात होईल. ते झायडस कॅडिलाच्या केंद्रात जाऊन लसीच्या विकासाच्या प्रक्रियेची माहिती घेतली. पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी ९.३० वाजता गुजरातमध्ये पोहोचतील, असं पटेल म्हणाले.
पीएम मोदी अहमदाबादमधून पुण्यातील सीरम संस्थेत जातील. जगातील लसींच्या निर्मितीचं सीरम हे सर्वात मोठं केंद्र आहे. पुण्यातून ते हैदराबादमधील भारत बायोटेक सेंटरलाही भेट देतील. पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये दुपारी ३.४० वाजता येतील. भारत बायोटेकच्या केंद्रात ते जवळपास तासभर माहिती घेतील. यानंतर ते संध्याकाळी ५.४० वाजता दिल्लीला रवाना होतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times