सातारा: पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची चिन्हे आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि राज्यसभेचे खासदार यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ( Latest News Updates )

वाचा:

महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शह देण्यासाठी उदयनराजेंच्या रूपाने मराठा कार्ड वापरणार असल्याची चर्चा आहे. २०१९ मध्ये केंद्रात विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आहे. आधीच्या कार्यकाळातही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने दीड वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यावर पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला होता. त्यामुळे या खेपेसही डिसेंबर अखेरीस पहिला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. त्यातच सध्याच्या सरकारमधील मंत्री रामविलास पासवान व सुरेश अंगडी यांचे निधन झाले आणि दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्याचा अतिरिक्त भार अन्य मंत्र्यांवर आहे. याशिवाय शिवसेनेचे अरविंद सावंत व अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्याने आणखीन दोन जागा रिक्त झाल्या आहेत. पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात संसदेचे अधिवेशन असल्याने त्यापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भाजपला उपयुक्त ठरणाऱ्या नावांची चर्चा सुरू आहे.

वाचा:

महाराष्ट्रात भाजपचे सरकार जाण्यास सातारची यांची भरपावसातील सभा कारणीभूत ठरली आणि त्यातूनच राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आली. या सरकारला शह देण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. मात्र, यामध्ये भाजप यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे जिथे महाराष्ट्रातील सत्तेतून भाजपच्या बाहेर काढण्याचे बीज पेरले गेले तिथेच पक्षाला ताकद देण्याचा विचार दिल्लीत सुरू झाला आहे. सरकारच्या कालावधीत मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रभर रान पेटविले गेले होते. सध्याच्या महाविकास आघाडी सरकार कार्यकाळातही हा आरक्षणाचा विषय सुटलेला नाही. त्यामुळे भाजपने या मुद्द्यावरून आता वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. त्याचवेळी शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करून आम्ही मराठ्यांच्या विरोधात नाही उलट छत्रपतींचा आम्ही सन्मान करतो हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा छत्रपती उदयनराजे यांच्या नावासाठी कमालीचे आग्रही असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे केंद्रात उदयनराजे यांना मंत्रिपद मिळाले तर महाराष्ट्रभर भाजपला त्याचा फायदा होईल अशी अटकळ भाजपच्या राज्यातील वर्तुळात बांधली जात आहे. त्यातूनच उदयनराजे यांचे नाव पुढे आले आहे आणि सातारा जिल्ह्यातील उदयनराजे यांचे समर्थकही राजेंना मंत्रिपद मिळणारच, असे छातीठोकपणे बोलताना दिसत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here